शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जायगावच्या ग्रामपंचायतीत सासू-सुनेचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:37 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी यंदा तरुणांना संधी देत त्यांच्यावर गावगाड्याची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये एकाच घरातील सासू-सून यांनी ग्रामपंचायतीत प्रवेश केल्याने पंचक्रोशीत तो एक चर्चेचा विषय बनला आहे.

ठळक मुद्दे तरुणांना संधी : निवडणूक प्रक्रिया शांततेत

जायगाव येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्ड क्र. १मध्ये दोन जनरल जागांसाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात सोमनाथ भगवान गीते, अतुल चंद्रकांत गीते व स्त्री राखीव जागेवर सविता मंगेश गीते हे उमेदवार विजयी झाले. वॉर्ड क्र. २ मधून दत्तात्रय रामचंद्र दिघोळे, तर स्त्री राखीव जागेवर लता रमेश मोहिते व ताईबाई रामा गायकवाड हे विजयी झाले. वॉर्ड क्र. ३मध्ये शालिनी शंकर दौंड व शरद महादू जाधव हे विजयी झाले आहेत. याच वॉर्डात मनीषा संतोष दौंड या बिनविरोध निवडून आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.सूनबाई बिनविरोधनऊ सदस्यांच्या निवडीत पहिल्यांदाच एका घरातील दोन सदस्य निवडून आले आहेत. यात सून मनीषा संतोष दौंड बिनविरोध, तर शालिनी शंकर दौंड या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. सासू व सून एकाचवेळी ग्रामपंचायत सदस्य झाल्याने नायगाव खोऱ्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत