शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यानेच केला मुलाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:23 IST

सिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. 

ठळक मुद्देवावी पोलिसांचा तपास । लहान भावाचाही कृत्यात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : भोजापूर धरणात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाच्या खुनाचा तपास करण्यात वावी पोलिसांना यश आले. अवघ्या चोवीस तासात वावी पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. दारूच्या नशेत आई-वडील यांना मारहाण करीत असल्याने या जाचाला कंटाळून लहान भाऊ आणि वडिलांनीच त्याचा खून करून हातपाय बांधून मृतदेह म्हाळुंगी नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी भोजापूर धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह कुचलेल्या अवस्थेत असल्याने दापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले होते. मृत युवकाच्या खिशात आधारकार्ड व लायसन्स आढळून आल्याने मृतदेहाची ओळख पटली होती. मृत युवकाचे नाव ज्ञानेश्वर माधव सोनवणे असून, तो संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथील रहिवासी असल्याचे  समजल्यानंतर त्यादृष्टीने वावी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली. शुक्रवारी मृतदेह आढळून आल्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी (पडिले) यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंंह, अपर पोलीस अधीक्षक  घारगे-वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासकामी पथके तयार करून मृत युवकाच्या गावात म्हणजे संगमनेर तालुक्यातील कासार-दुमाला येथे पाठविले होते. सहाय्यक निरीक्षक गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे, विकास काळे यांच्यासह हवालदार उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, नवनाथ आडके यांनी कासार दुमाला येथे जाऊन तपास केल्यानंतर मृत युवकाच्या घरी सोमवार (दि. २४) रोजी जोरदार भांडण झाल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. घरात भांडणे झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडिल माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती.मयत ज्ञानेश्वर हा दारू पिऊन आई, वडील, भाऊ यांना मारहाण करण्यासह त्रास देत होता. या जाचाला कंटाळून वडील माधव सोनवणे व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे यांनी त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला नदीपात्रात फेकून दिले.संशयितांच्या बोलण्यात विसंगतीघरात भांडण झाल्यामुळे पोलिसांची संशयाची सुई मृत युवकाचे वडील माधव गबाजी सोनवणे (६५) व लहान भाऊ बाळासाहेब सोनवणे (२७) याच्याभोवती फिरली होती. पोलिसांनी वडील व भाऊ यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर दोघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी