शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बछड्यांना आईने घेतले कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:39 IST

गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी, वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई...., असे मातृत्वाचे वर्णन कवी यशवंत यांनी आपल्या शब्दांत केले आहे. त्याची प्रचिती वडनेरदुमालाच्या पोरजे मळ्यात अनुभवयास आली.

ठळक मुद्देदोन दिवसांनंतर यश : गुरुवारी पहाटे बिबट मादीचे स्थलांतर

नाशिक : गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी, वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई...., असे मातृत्वाचे वर्णन कवी यशवंत यांनी आपल्या शब्दांत केले आहे. त्याची प्रचिती वडनेरदुमालाच्या पोरजे मळ्यात अनुभवयास आली. ऊसतोडीदरम्यान शेतात अवघ्या काही दिवसांचे बिबट्याची बछडे आढळले. या बछड्यांची डोळे उघडताच जणू आईशी ताटातूट झाली. वनविभागाने इको-एको व वाइल्डलाइफ ट्रस्ट आॅफ इंडिया या वन्यजीवप्रेमी संस्थांच्या मदतीने बछड्यांची आईशी पुन्हा भेट घालून देण्याचा निश्चय केला. वनविभागाच्या अथक प्रयत्नांना गुरुवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास यश आले.वडनेरदुमाला शिवारातील त्र्यंबक पोरजे यांच्या गट क्रमांक-९२मधील शेतीत ऊसतोड सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या या वन्यप्राण्याचे तीन बछड्यांना ऊसतोड कामगारांना मंगळवारी (दि.२१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आली. त्यांनी तत्काळ ऊसतोड थांबवून पोरजे यांना माहिती दिली. पोरजे यांनी त्वरित वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी यांच्याशी संपर्क साधला. भदाणे यांनी तत्काळ गोसावी यांच्यासह वनरक्षक गोविंद पंढरे, उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे आदींना घेत पोरजे मळागाठला.यावेळी इको-एको फाउण्डेशनचे स्वयंसेवक वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, अभिजीत खेडलेकर यांनाही बोलविण्यात आले. दरम्यान, बिबट्याची दोन बछडे वन कर्मचाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत सुरक्षितरीत्या प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये ऊसशेतीत झाकून ठेवली होती. संध्याकाळ होताच संपूर्ण परिसर निर्मनुष्य करत वनविभागाच्या पथकाने बिबट्यांची क्रेटवरील उसाची चिपाडे बाजूला करत दिसेल असे केले. त्या दिशेने अ‍ॅटोमॅटिक ट्रॅप कॅ मेºयासह वायफायने जोडता येणारा ३६० अंशांत फिरणारा कॅमेराही तैनात केला. वनरक्षकांसह स्वयंसेवक घटनास्थळी कॅमेºयाच्या चित्रीकरणावर नजर ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत बिबट मादी पिल्लांजवळ आली नाही; मात्र बछडे उसात निघून गेल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.बुधवारी सकाळपासून पुन्हा पोरजे मळ्यात उर्वरित ऊसतोड सुरू करण्यात आली. यावेळी पुन्हा दुपारी १२ वाजेच्या सुमारास बछडे मिळून आले. बछडे पुन्हा वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षितरीत्या ताब्यात घेत क्रेटखाली झाकून ठेवले. बुधवारी संध्याकाळी पुन्हा बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट मादी क्रेटजवळ येऊन पंजाने क्रे ट बाजूला करताना कॅमेºयात कैद झाली. तिने आपल्या दोन्ही बछड्यांना सहजरीत्या तोंडात धरत ऊसक्षेत्र सोडून पलायन केले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार