शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात श्रीरामाच्या पंचवटीत सर्वाधिक वृक्षसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:09 IST

वृक्षगणना : खासगी जागांवर २१ लाख वृक्षसंपदा

ठळक मुद्देवृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली सरकारी जागांवर २७ लाख १० हजार वृक्षसंख्या

नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनखात्याकडून मोठ्या संख्येने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जात असताना, सरकारी जागांवर २७ लाख १० हजार वृक्षसंख्या आढळून आली आहे, तर खासगी व इतर जागेवर नागरिकांच्या सहभागातून २० लाख ८४ हजार वृक्ष आढळून आले आहेत.महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षगणनेची प्रक्रिया एका खासगी एजन्सीमार्फत राबविली जात आहे. आतापर्यंत शहरात ४७ लाख ९५ हजार ३८७ वृक्ष आढळून आले आहेत. अद्याप आर्टिलरी सेंटर व महाराष्टÑ पोलीस अकादमी या भागातील वृक्षगणनेचे काम शिल्लक आहे. वृक्षगणनेत सर्वाधिक १७ लाख ५२ हजार १७७ वृक्षसंख्या ही एकट्या पंचवटी विभागात आढळून आली आहे. त्यामुळे पंचवटी खऱ्या अर्थाने आजच्या युगातही दंडकारण्याचा भाग असल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल सिडको विभागात १५ लाख ८५ हजार ६१८ वृक्षसंख्या आढळून आली आहे. नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने याठिकाणी वृक्षांचे प्रमाण दीड टक्क्यापेक्षाही कमी आहे. दरम्यान, महापालिका, सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. त्यावर कोट्यवधीचा खर्च होतो. याशिवाय, गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाच्या वन विभागामार्फत वृक्षलागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे असतानाही सरकारी जागेतील वृक्षसंख्या २७ लाख १० हजारांच्या आसपास आढळून आलेली आहे, तर खासगी व इतर जागेत नागरिक सहभागातून लागवड केलेली २० लाख ८४ हजार वृक्षसंख्या निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे, सरकारी वृक्षलागवडीवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका