शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मक्याची सर्वाधिक पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:46 IST

देवळा : देवळा तालुक्यात २२९९० हेक्टर (७६.०७ टक्के ) क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी मका पीकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मका लागवडीत घट होईल असा अंदाज वर्तिवण्यात येत होता, परंतु गतवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत मका पिकाची सर्वाधिक पेरणी तालुक्यात झाली असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देखरीपात व्यस्तता : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : देवळा तालुक्यात २२९९० हेक्टर (७६.०७ टक्के ) क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी मका पीकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मका लागवडीत घट होईल असा अंदाज वर्तिवण्यात येत होता, परंतु गतवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत मका पिकाची सर्वाधिक पेरणी तालुक्यात झाली असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी दिली आहे.देवळा तालुक्याची ओळख असलेला वसाका बंद पडल्यानंतर उसाची लागवड कमी होत गेली. गिरणा खोऱ्यातील उसाचे क्षेत्र कमी होऊन खरीप हंगामात घेण्यात येणाºया पीकांपेक्षा हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्रात दरवर्षी वाढ होत गेली. चालू वर्षी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. चक्री वादळामुळे देवळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकºयांनी खरीपाची पेरणी सुरू केली होती.चांगल्या हंगामाची शेतकºयांना अपेक्षासध्या मेशीसह परिसरात खरिपाच्या पेरणीच्या कामांची लगबग सुरू आहे.गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी खरीप हंगाम चांगला असेल अशी सर्व शेतकरी आशा बाळगून आहेत. तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही शेतकरी मात्र पाऊस पडल्याबरोबर कामाला लागला आहे. सध्या मका, मुग, उडीद, भुईमूग, बाजरी आदी पिकांची जोरदार पेरणी सुरू झाली आहे. या वर्षी मका पिकांचे मात्र क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मका पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. सध्या सगळीकडे मान्सूनचा पाऊस पडत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी