ज्या बसथांब्यांवरील निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे, अशा थांब्यांवर प्रवाशांना बस येईपर्यंत ताडकळत उभे राहावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना तसेच पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांनादेखील अडचणींचा सामना करावा लागतो. शहर बससेवेच्या महानगरातील शेकडो निवारा शेडवर जाहिराती झळकावून त्यातून महसूल गोळा केल्यास निवारा शेडची व्यवस्था राखणे सहजशक्य आहे. मात्र, स्वहितात गुंतलेल्या प्रशासनाला अशा योजना राबविण्याची उपरती होणे अवघडच वाटते.
शहरातील बहुतांश निवारा शेडची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST