शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

भरवस्तीत धोकादायक उघडे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:39 IST

वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगेवासीयांमध्ये संताप : वारंवार कळवूनही महावितरणचे दुर्लक्ष

खेडलेझुंगे : वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.रूई-कोळगाव रस्त्यावर खंडेराव नरहरी गवळी यांचे वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल सुरू आहे. सदरच्या रोहित्राचे खांब तिरपे झाले आहेत. हे रोहित्र उघड्या स्वरूपात आहे. त्यावरील पत्र्याच्या पेट्या गंजून सडून गेलेली आहे. त्यामुळे त्यातील सर्व जोडणी करण्यात आलेले वायरींचे जॉइंट उघडे आहेत.फुटलेले व नादुरुस्त फ्युज त्या फ्युजमधील वाहिन्या परस्पर कनेक्शनसाठी जोडण्यात आल्या आहेत. त्यांना टेपही लावण्यात आलेला नाही किंवा विद्युतरोधक अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या वस्तीवर लहान मुले, पाळीव प्राणीही आहेत. या उघड्या व धोकादायक रोहित्रांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी या रोहित्राची तत्काळदुरु स्ती करून नवीन खांब बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी याबाबत सजगता दाखवून तत्काळ परिसरातील अशा धोकादायक रोहित्रांचीमाहिती गोळा करून त्यांच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवून दुरु स्ती करणे गरजेचे आहे.रोडलगत असलेल्या रोहित्रांची अशी दयनीय अवस्था असून, शेतातील, झाडांच्या गर्दीत असलेल्या रोहित्रांबाबत विचार न केलेलाबरा. परिसरातील एकूण रोहित्रांपैकी नादुरुस्त रोहित्रांची संख्यानक्कीच जास्त असल्याचा अंदाज आहे.ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व समान्य जनता यांच्याबाबत भीत भीतच माहीती देतात.ग्रामीण भागात बिबट्या, सर्प, रानडुकरांसारख्या श्वापदांमुळे हैराण असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांना जाणूबुजून रात्रीची वीज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण आहे. तरी या परिसरातील शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी परिसरातील नादुरु स्त रोहित्र व गंजलेल्या पेट्या, तिरपे झालेले खांब, दोन खांबामधील वीजवाहिनींचा झोल व इतर समस्यांची तत्काळ वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून दुरु स्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण