शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यापेक्षा जिल्ह्यातील मृत्युदर कमी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 01:06 IST

कोरोना नियंत्रणासाठी  नाशिक  जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे  जिल्ह्यातील कोरोना  नियंत्रणात आल्याचे  दिसून येते.    जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्युदरदेखील राज्याच्या तुलनेत कमी झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले.

ठळक मुद्दे कोरोना कामकाजाचा घेतला आढावा; अधिकाऱ्यांची बैठक

नाशिक : कोरोना नियंत्रणासाठी  नाशिक  जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे  जिल्ह्यातील कोरोना  नियंत्रणात आल्याचे  दिसून येते.    जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्युदरदेखील राज्याच्या तुलनेत कमी झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले.        शासकीय विश्रामगृह  येथे  आठवले कोरोना आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.  यावेळी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, केंद्र सरकारमार्फत कोरोनाच्या कालावधीत सर्वच राज्यांना अन्न धान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे.  सद्य:स्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.  यावेळी माहिती सांगताना जिल्हाधिकारी  मांढरे म्हणाले, कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होण्यासोबतच जिल्ह्यात रुग्णांसाठी दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. उद्योगांनादेखील पर्याप्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. रेमडिसिवर इंजेक्शनचा साठादेखील आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे राज्यात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण झाली असून, या फेरीत साधारण ४ हजार २०३ बाधित रुग्ण आढळून आले असल्याने संसर्गाचा वाढता धोका आटोक्यात आणण्यास यश मिळाले आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण सद्य:स्थितीत सुरू असल्याचीदेखील माहिती यावेळी मांढरे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागातील प्रकरणांची माहितीn सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर योजना, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमअंतर्गत घडलेले गुन्हे व त्याअंतर्गत देण्यात आलेले अर्थसहाय्य, मातोश्री वृद्धाश्रम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. याअनुषंगाने प्रलंबित प्रकरणाची माहिती सादर करण्यात यावी, अशा सूचना आठवले यांनी यावेळी दिल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेcorona virusकोरोना वायरस बातम्या