शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:21 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात असलेल्या चार त्यातही खरे तर तीन शहरी विधानसभा मतदान केंद्रे असून, या तीन मतदारसंघांच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक वाढली असल्याने यंदा ग्रामीण भाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.नाशिक लोकसभा मतदार-संघात पूर्व, पाश्चिम आणि मध्य नाशिक हे तीन पूर्णत: शहरी विधानसभा मतदान केंद्रे आहेत. देवळाली मतदारसंघात नाशिक महापालिकेच्या हद्दीचा काही भाग असून, उर्वरित भाग नाशिक तालुक्यातील संसरी, एकलहरे, शिंदे गाव आहे, तर सिन्नर, इगतपुरी- त्र्यंबक हे विधानसभा मतदारसंघ पूर्णत: ग्रामीण भागातील  आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरी मतदारांची संख्या दहा लाख इतकी आहे. त्यामुळे ते निर्णायक मानले जात असले तरी सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान अधिक झाले. नाशिक पूर्व मतदारसंघात ५५.०६, पश्चिममध्ये ५५.४३, तर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.९६ टक्के मतदान झाले आहे, तर ग्रामीण बहुल भागाचा समावेश  असलेल्या देवळालीत ६०.७३ टक्के, सिन्नरमध्ये ६४.९७, तर इगतपुरी मतदारसंघात ६७.६० टक्के मतदान झाले आहे.६९ पैकी १६ मतदानकेंद्रांवर नीच्चांकी मतदाननाशिक पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये ५३.३८ टक्के इतके मतदान झाले आहे. यंदा १.६८ टक्के त्यात वृद्धी झाली आहे.नाशिक पश्चिम मतदारसंघात गेल्यावेळी ५५.४३ टक्के मतदान झाले होते. त्यात फक्त ०.१८ टक्के इतकी वृद्धी झाली आहे. यंदा या मतदारसंघात ५५.६१ टक्के मतदान झाले आहे.नाशिक मध्य या मतदारसंघात २०१४ मध्ये ५२.८७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यात ३.०९ टक्के इतकी वाढ झाली आहे.शहरी व निमशहरी भागातील मताधिक्यही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. शहरी भागातील मतदान निर्णायक ठरत असला तरी तशी स्थिती यंदा नाही. ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडलेले दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग हा सत्ताधिकारी पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल किंवा विरोधकांच्या पथ्यावर पडेल यावर सध्या काथ्याकुट सुरू आहे.देवळाली,  इगतपुरीत घटनाशिक लोकसभा मतदारसंघातनाशिक शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढत असली तरी देवळालीत मात्र गत वेळेच्या तुलनेत ३.०२ टक्के, तर इगतपुरीत १.३२ टक्के इतकी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात झालेले मतदानविधानसभा एकूण मतदान टक्केमतदारनाशिक पूर्व ३,५२,५५४ १,९४,१२० ५५.०६नाशिक (प.) ३,९०,३८६ २,१७,१०१ ५५.६१नाशिक मध्य ३,१५,८८७ १,७६,७८० ५५.९६सिन्नर २,९९,०७४ १,९४,३१६ ६१.८८देवळाली २,६३,७०८ १,६०,१५० ६०.७३इगतपुरी २,६०,४४२ १,७६,०४९ ६७.६०एकूण १८८२०५१ १११८५१६ ५९.४३

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक