शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आणखी ट्रॅव्हल्स कंपन्या येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:08 IST

राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा केला असला तरी शिवशाहीचे होणारे अपघात, प्रवासी संख्येतील घट आणि चालकांविषयी प्रवाशांना वाटणारा विश्वास याबाबतीत महामंडळ तोट्यातच असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचालकांना रान मोकळे : महामंडळाचे चालक मात्र चिंतित

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा केला असला तरी शिवशाहीचे होणारे अपघात, प्रवासी संख्येतील घट आणि चालकांविषयी प्रवाशांना वाटणारा विश्वास याबाबतीत महामंडळ तोट्यातच असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. कोणत्याही चुकीसाठी एकीकडे महामंडळाच्या ड्रायव्हरवर केसेस केल्या जात असताना खासगी शिवशाहीच्या चालकला मात्र अभय देण्यात येत असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.राज्य परिवहन महामंडळात सध्या पाच बड्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या शिवशाही बसेस राज्यातील विविध डेपोंमध्ये धावत आहेत. महामंडळ आणखी काही गाड्या घेण्याच्या तयारीत असून, नवीन ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा महामंडळाच्या हालचाली असल्याने महामंडळच्या चालक-वाहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या कर्मचाऱ्यांनी आता शिवशाहीला विरोध करण्याबरोबरच चालक-वाहकांना काम मिळावे तसेच तसेच ड्युटी अलोकेशन टी-९ पद्धतीने करावी, अशी मागणी केली आहे. महामंडळाच्या चालकांना ड्युटी मिळेल अशी हमी महामंडळाने द्यावी या मागणीसाठी आता संघटना प्रयत्नशील असल्याचे समजते.खासगी शिवशाही बसेस चालकांच्या गाड्यांना अपघात होत असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर-कंडक्टर मॅकेनिक युनियनच्या वतीने करतानाच मागील काही महिन्यांपासून मोठे अपघात झाल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ९ मे रोजी बोरीवली-कराड, ३० मे रोजी यवतमाळ, १७ जून रोजी लातूर, ३ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि ४ जुलै रोजी पेठ येथे शिवशााही बसेसचे अपघात झाले असल्याचे सांगण्यात आले.खासगी शिवशाहीमध्ये पुणेकडे जाणारा चालक कॅबीनमध्ये प्रवासी बसवून घेऊन जात असताना दुसरीकडे महामंडळाच्या बस मध्ये एकजरी प्रवासी विनातिकीट आढळला किंवा १ रुपया जरी वाहकाच्या हिशेबात कमी आला तरी त्याच्या चार्जशिट दाखल केले जाते. परंतु खासगी चालकाला महामंडळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट तो महामंडळाचा गणवेश परिधान करून खासगी वाहन चालवत असल्याने प्रवाशांची फसगत होत आहे.शिवशाहीविरोधात कर्मचाºयांचे उपोषणराज्य महामंडळाने शिवशाही बसेस सुरू केल्यापासून नाशिक डेपो १ मधील कर्मचाºयांना काम मिळत नसल्याने तसेच चालक-वाहकांची बदली केली जात असल्याच्या निषेधार्थ चालक-वाहक संघटनेच्या वतीने शिवशाही धोरणाच्या विरोधात संप पुकारला होता़ नाशिक डेपोत शिवशाही आल्यापासून महामंडळाचे कायम स्वरूपी चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाºयांना काम मिळत नसल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे आहे़ शिवशाही बसेस आणि चालकांसाठी पायघड्या घातल्याजात असताना महामंडळ कर्मचाºयांवर मात्र कारवाई केली जात असल्याने प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असे महाराष्ट्र एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, मॅकेनिक युनियनचे नेते कैलास कराड यांनी सांगितले़

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप