शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या दीड हजारहून अधिक जागा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:31 IST

दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेची सुरुवात झाली असून, जिल्हाभरातील अन्य महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशाचे नियोजन सुरू झाले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे.

नाशिक : दहावीच्या परीक्षा पार पडल्यानंतर नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेची सुरुवात झाली असून, जिल्हाभरातील अन्य महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशाचे नियोजन सुरू झाले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दीड हजारहून अधिक जागा वाढणार असून, दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरासह जिल्हाभरातील कनिष्ठमहाविद्यालयांत कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखा यांच्या तब्बल ७८ हजार ८०० जागा उपलब्ध होणार आहेत.नाशिकसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यंदाही अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार आहे. नाशिकमध्ये यंदा देवळाली विभागातील तीन महाविद्यालये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी शहरातील महापालिका हद्दीतील ५५ महाविद्यालयांत आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, त्यासाठी एकूण २७ हजार जागा उपलब्ध आहेत, तर जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅफलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, ५१ हजार ८०० जागा उपलब्ध असतील. नाशिक शहरात उन्नती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, संदीप फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज, अ‍ॅम्ब्रो ज्युनिअर कॉलेज या वर्षापासून सुरू होणार आहेत. पाच कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकड्या घेतल्या आहेत, तर दहा कॉलेजांनीही वाढीव तुकड्यांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माहिती पुस्तिका उपलब्ध होतील.नाशिक जिल्ह्यातील शाखानिहाय जागा  नाशिक शहरातील विविध ५५ महाविद्यालयांमध्ये सुमारे २७ हजार जागा असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २९८ महाविद्यालयांमध्ये ५१ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत. यात कला शाखेच्या ग्रामीण भागात २६ हजार ६४० व शहर परिसरात ५४२० जागा आहेत, तर विज्ञानच्या ग्रामीणमध्ये १७ हजार ८० व शहरात १० हजार, वाणिज्य शाखेच्या ग्रामीणमध्ये ६ हजार ६०० व शहर परिसरात ९ हजार ८०० जागांसह संयुक्त शाखांच्या १४८० ग्रामीण जागा व ७८० शहरी जागा अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयeducationशैक्षणिक