शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

निम्म्याहून अधिक कोरोनायोद्धे दुसऱ्या डोसपासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 15:21 IST

नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही श्रेणीत येणाऱ्या १ लाख २८ हजार ९११ कर्मचाऱ्यांना झाला होता. मात्र फेब्रुवारी, मार्चपासून दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप ५९८२५ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला असून उर्वरीत सुमारे ६९ हजार फ्रंटलाईन वर्कर्स अद्यापही दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

ठळक मुद्देअनास्था : फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून प्राधान्याने पहिली डोस मिळाल्यानंतर मात्र प्राधान्यक्रम नाही

नाशिक : जिल्ह्यात प्रारंभीच्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळेच पहिल्या डोसचा लाभ या दोन्ही श्रेणीत येणाऱ्या १ लाख २८ हजार ९११ कर्मचाऱ्यांना झाला होता. मात्र फेब्रुवारी, मार्चपासून दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप ५९८२५ नागरिकांनाच दुसरा डोस देण्यात आला असून उर्वरीत सुमारे ६९ हजार फ्रंटलाईन वर्कर्स अद्यापही दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.कोरोना काळात ह्यफ्रंट लाईनह्ण वर्कर म्हणून पोलीसांपासून विविध घटकांनी काम केले. त्या सर्व घटकांना प्रारंभीच्या टप्प्यात पहिला डोस देण्यात तत्परता दाखविण्यात आली. मात्र, दुसऱ्या डोसमध्ये तशा स्वरुपाची तत्परता किंवा प्राधान्यक्रम दिला गेला नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दुसऱ्या लसीसाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे किमान काही प्रमाणात तरी त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतू, त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे लसीकरण झालेले नसल्याने अनेक सदस्य बाधित होत असल्याचे समोर आले आहे. पोलीसांसह असे अन्य फ्रंटलाईन वर्कर्स घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटूंबातील पत्नी, लहान मुले, वृद्धांशी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने करोनाचा विषाणू त्यांच्या कुटूंबीयांपर्यंत जात असल्याने अनेकांना संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र झटणार्‍या या फ्रंटलाईन वर्कर्सना एकीकडे कोरोनाशी तसेच दुसरीकडे कुटुंबातील कुणालाही ही लागण होऊ नये, यासाठी झटावे लागते. गत सव्वा वर्षांपासून सर्व फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोरोना योद्धे कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहे. पहिल्या लाटेत त्यातील अनेक कर्मचारी बाधित झाले. काहींचे निधन झाले. तर काही बरे होऊन पुन्हा कार्यरत झाले. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या फ्रंटलाईन वर्कर्सना पुन्हा त्यांच्या कामात जुंपून घ्यावे लागले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे निम्म्याहून अधिक कोरोना फ्रंटलाईन वर्कर्स दुसऱ्या डोसपासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य