शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:24 IST

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशप्रक्रिया : तीन फेऱ्यांमध्ये साडेतेरा हजार प्रवेश निश्चित

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून, या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रात अकरावीच्या २३ हजार ८६० जागा असून, आत्तापर्यंत २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालय निवडल्याने अन्य जागा रिक्त राहिल्या आहेत.शहरातील सुमारे २३ हजार ८६० जागांपैकी केवळ साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली असली तरी यातील २ ते अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांधील सुमारे आठ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी नाशिक शहरात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार तीन नियमित फेºया राबविण्यात आल्यानंतर चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पसंती दिल्याने या फेरीनंतरही शहरात अकरावीच्या आठ हजारांहून अधिक जागा रिक्तराहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अजूनही संधी : प्रथम प्राधान्य मिळणारविशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटआॅफ सर्वाधिक ८४ टक्के लागला. याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कटआॅफ ९०.२० टक्के लागला. पहिल्या तीनफेऱ्यांच्या तुलनेत इतर महाविद्यालयांचे कटआॅफ खाली आले आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी प्रथम तीनफेºयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विशेष फेरीत अन्य महाविद्यालयांचे पर्याय निवडल्याचे दिसून येत असून, या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य दिले असणार नामांकित महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना अजूनही संधी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय