शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला रिपाइंचा उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 00:05 IST

मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : प्रशासनास निवेदन

मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व ढिसाळ कारभाराच्या विरोधात मनमाड शहर रिपाइंच्या वतीने रुग्णालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं भवनापासून मोर्चा काढण्यात आला. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला.                         या रुग्णालयात सुविधांचा अभाव असून, या ठिकाणी ऑक्सिजन सुविधा, सोनोग्राफी व्यवस्था, रक्तपेढी सुविधा उपलब्ध नाही. तसेच मनमाड या महत्त्वाच्या शहरातील रुग्णालयात भूलतज्ज्ञ तसेच एम.डी. डॉक्टरची आवश्यकता असताना नेमणूक करण्यात आली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.                      रुग्णास व नातेवाईकांना अपुऱ्या सुविधांमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत कार्यवाही न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे. मोर्चेकऱ्यांच्या वतीने रुग्णालय प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी रूपेश अहिरे, विलास अहिरे, गुरुकुमार निकाळे, सुरेश शिंदे, पी. आर. निळे, प्रमोद अहिरे, प्रदीप घुसळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार