शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पेस्टकंट्रोलचे मासिक वेळापत्रक संकेतस्थळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:51 IST

महापालिका : तक्रारींनंतर ठेकेदाराकडून विभागनिहाय नियोजन

ठळक मुद्देडास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीबाबत नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत नेहमीच ओरड मागील वर्षी डेंग्यूच्या आजारामुळे नाशिककरांमध्ये भयाचे वातावरण होते

नाशिक : शहरात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणीबाबत नगरसेवकांपासून नागरिकांपर्यंत नेहमीच ओरड होत असल्याने आयुक्तांच्या आदेशान्वये आता आरोग्य विभागाने धूर फवारणीचे मासिक वेळापत्रकच निश्चित करत ते महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकले आहे. त्यामुळे आपल्या भागात कोणत्या दिवशी धूर फवारणी होणार आहे, याची माहिती नागरिकांना समजण्यास मदत होणार आहे.महापालिकेने पेस्ट कंट्रोलचा ठेका दिग्विजय एंटरप्रायझेस या कंपनीला दिलेला आहे. ठेकेदाराकडून प्रभागात डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी होतच नाही, अशी तक्रार नेहमीच नगरसेवकांपासून नागरिक करत आलेले आहेत. महासभा, स्थायी समितीपासून ते प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये नगरसेवकांकडून याबाबत वेळोवेळी आवाज उठवला जातो. सदर ठेकेदाराची नियुक्ती ही न्यायालयाच्या आदेशान्वये झाल्याने मागील वर्षात स्थायी समितीच्या सभांमध्ये सदर ठेका रद्द करण्याची मागणी वारंवार नगरसेवकांनी केली होती शिवाय, सभापतींनीही ठेका रद्दची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते. आरोग्य विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण केली जात असल्याचाही आरोप केला गेला होता. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी आढावा घेतला असता, पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराकडून धूर फवारणीचे वेळापत्रक निश्चित करून घेत ते सर्व लोकप्रतिनिधींसह नागरिकांनाही कळावे यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, संबंधित ठेकेदाराने सहाही विभागांकरिता धूर फवारणीचे नियोजन केले असून, रविवार सुटीचा दिवस वगळता निश्चित केलेल्या भागात सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत धूर फवारणी केली जात आहे. मागील वर्षी डेंग्यूच्या आजारामुळे नाशिककरांमध्ये भयाचे वातावरण होते. डेंग्यू वाढण्यास ठेकेदारच कारणीभूत असल्याचाही आरोप केला गेला होता. आता फवारणीचे नियोजन केल्याने डेंग्यूसह अन्य आजारांवर नियंत्रण येण्यास मदत होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.तक्रारही करता येणारधूर फवारणीचे विभागनिहाय व प्रभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, मार्च महिन्याचे वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांना धूर फवारणी कधी होणार हे कळणार आहे. मात्र वेळापत्रकानुसार धूर फवारणी न झाल्यास नागरिकांसह नगरसेवकांना महापालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार नोंदवता येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका