शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:39 IST

नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे.

नाशिक : नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे. या वादळांच्या प्रभावाने मान्सूनचे आगमन लांबणार असून, या काळात तपमानाचा ४० अंश सेल्सिअसपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात म्हणजेच जपानच्या पूर्वेला व कॅनडाच्या पश्चिमेला आलेली वादळे ही या दशकातील सर्वात मोठी चक्रीवादळे ठरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडावरील सर्व बाष्प आणि ढग हे चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडे ओढले जात आहेत. त्यामुळेच  विविध भागातून ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहत असून, सर्व बाष्पयुक्त ढग भूखंडावरून वाहून जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पठार व दख्खनचे पठार या  पठारी भागात पावसाचा खंड पडणारआहे. जोपर्यंत प्रशांत महासागरातील वादळे शांत होत नाहीत तोपर्यंत पाऊस लांबण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याला साधारणत: १० ते ११ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, १२ ते २२ जूनपर्यंत नाशिक जिल्हा व परिसरात पाऊस ओढ देणार आहे. ही परिस्थिती २३ जूननंतर बदलायला सुरु वात होईल व मान्सूनची प्रगती, प्रवास उत्तरेच्या दिशेने सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.चक्रीवादळांमुळे मान्सून लांबणार असल्याने २२ जूनपर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात तपमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची लागवड केलेली असेल त्यांनी २ दिवसाआड सिंचन करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ज्यांनी कोरड लागवड अथवा धूळपेरणी केली आहे, ती वाया जाण्याची भीतीही असून, किमान पाऊस पडल्याशिवाय शेतकºयांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञ व जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस