नाशिक : तपमानाचा पारा अनियमित स्वरूपात कमी-जास्त होत असल्याने पावसाची केवळ भुरभुरच झाल्याने नाशिककरांना मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस हजेरी लावत नसल्याने रात्रीच्या वेळेसही उष्मा कायम राहत असल्याने केवळ पहाटेच्या सुमारासच थोडासा दिलासा मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामानाने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. सकाळी थंडी, दुपारी ऊन अशी विषम परिस्थितीही नाशिककरांनी काही दिवस अनुभवली. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने आता शहरात मान्सून हजेरी लावणार, अशी चिन्हे दिसत होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास वातावरणात अधिकच उष्मा जाणवू लागल्याने आज मुसळधार पाऊस होईल, असे वाटत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत केवळ प्रतीक्षाच नाशिककरांच्या नशिबी आली. (प्रतिनिधी)
मान्सूनची प्रतीक्षा कायम
By admin | Updated: June 14, 2015 01:55 IST