शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
4
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
5
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
6
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
7
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
8
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
9
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
10
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
11
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
12
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
13
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
14
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
15
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
16
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
17
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
18
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
19
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
20
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व तडाखा; सिन्नर, येवल्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:25 IST

सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. पांढुर्ली- भगूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विंचूरदळवी शिवारात वादळाने शेतकऱ्याच्या नेटशेडचे नुकसान झाले.

मुंबई/नाशिक : केरळात धडक मारलेल्या मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने दमदार आगेकूच सुरू असताना मान्सूनपूर्व पावसाचा हंगामा सुरू झाला आहे. मराठवाड्यात उस्मानाबादसह भूम आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. धुळे जिल्ह्यात गारपीट झाली. शुक्रवारी सायंकाळी पुण्यासह सातारा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला.सिन्नर तालुक्यात वादळी पाऊससिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. पांढुर्ली- भगूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विंचूरदळवी शिवारात वादळाने शेतकऱ्याच्या नेटशेडचे नुकसान झाले. पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली, विंचूरदळवी भागात वादळी पाऊस झाला. वावी, घोटेवाडी, पांगरी, देवपूर, वडांगळी परिसरात वादळी पाऊस झाला. सायखेडा परिसरातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, महाजनपूर, म्हाळसाकोरे परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. पावसाची सुरुवात झाल्याने शेतकºयांना सुखद धक्का मिळाला आहे.  येवला तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली यावेळी वादळी वाºयासह गारांचा पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसाने पूर्व भागातील अंदरसूल, देवळाने, गवंडगाव, गारखेडे परीसरासह ममदापूर, सावरगाव परिसरात चांगलीच त्रेधा उडाली.नांदेड शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र धांदल उडाली़ शहरातील हिंगोलीगेट अंडरब्रीज पावसाने बंद पडला़ नवामोंढा, महावीर चौक, भगतसिंघ रोड, आनंदनगर, बाबानगर भागात पाणी साचले होते़ नांदेड शहरात ४९ मिमी पावसाची नोंद झाली. भोकर तालुक्यात तासभर झालेल्या धो-धो पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. धारजनी येथे झालेल्या पावसात घराची भिंत पडून परमेश्वर पांडुरंग कानगुलकर (११) यांचा मृत्यू झाला तर घरातील तिघे किरकोळ जखमी झाले. मुदखेड, अर्धापूर, कंधार, लोहा, नायगाव आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. पाडोळी, भूम, माणकेश्वर मंडळातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस