शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:57 IST

निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली.

ठळक मुद्देपारितोषिक वितरण : निफाड येथे अध्यक्ष चषक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

सायखेडा : निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली.अध्यक्षस्थानी निफाड पंचायत समितीच्या सभापती अनुसया जगताप होत्या, तर प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, पंचायत समिती सदस्य पंडित आहेर, शिवाजीराजे ढेपले, निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन नंदलालजी चोरडिया, सरस्वती विद्यालयचे चेअरमन प्रवीण कराड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी केले. स्पर्धेमध्ये निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी वक्तृत्व, चित्रकला, वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, गीतगायन, धावणे, कबड्डी, खोखो या स्पर्धा घेण्यात आल्या. दिवसभर सर्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर दुपारी ४ वाजता निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवाभाऊ सुरासे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, सोमनाथ पानगव्हाणे, नगरसेविका सुनीता कुंदे, केशव तुंगार, विनायक टाकळकर, ज्योती भागवत यांच्या उपस्थितीत विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, के. एम. बोरसे, व्ही. एन. गायकवाड, केंद्रप्रमुख विश्वास सानप, नूतन पवार, ओंकार वाघ, मुख्याध्यापक, पदाधिकारी प्रयत्नशील होते.विजयी घोषित करण्यात आलेले विद्यार्थी...लहान गट : वक्तृत्व : मोनिका जाधव प्रथम, मानसी पवार द्वितीय, गायत्री डोईफोडे तृतीयचित्रकला : तन्मय साबळे प्रथम, ओंकार बागुल द्वितीय, आदित्य पाटील तृतीयधावणे मुली : चंचल आहेर प्रथम, माया बर्डे द्वितीय, प्रवीणा चाबुकस्वार तृतीयधावणे मुले : अथर्व काकड प्रथम, रोहित कंक द्वितीय, ऋषिकेश शिंदे तृतीयवैयक्तिक गायन : सार्थक आहेर प्रथम, सागर माळी द्वितीय, सर्वज्ञ चोभे तृतीयवैयक्तिक नृत्य :रेणुका शिंदे प्रथम, सान्वी दुधाणे द्वितीय, श्रद्धा थाटे तृतीय.समूहगायन : रेल्वे स्थानक शिवडी प्रथम, कोकणगाव द्वितीय.समूहनृत्य : देवगाव प्रथम, पिंपळस द्वितीय.मोठा गट वक्तृत्वप्राची आरोटे प्रथम,पूजा कमानकर द्वितीय,चंचल ठोंबरे तृतीय.चित्रकलाधनश्री चौधरी प्रथम,ऋतुजा गाडे द्वितीय,पीयूषकुमार यादव तृतीय.धावणे मुलेआकाश माळी प्रथम,चेतन बर्डे द्वितीय,जगन पिंपळे तृतीयधावणे मुलीप्रणाली सानप प्रथम,रेणुका गुंबाडे द्वितीय,निकिता माळी तृतीय.वैयक्तिक गायनसमृद्धी रु कारी प्रथम,निकिता जाधव द्वितीय,पायल पेडेकर तृतीय.समूहगायनकोकणगाव प्रथम,सोनेवाडी बुद्रुक द्वितीय,वैयक्तिक नृत्यसाक्षी कडवे प्रथम,निकिता जाधव द्वितीय,श्रद्धा निकम तृतीय.समूहनृत्यकाथरगाव प्रथम,ओझरटाउनशिप द्वितीय,खोखो मुलेधारणगाववीर प्रथम,पिंपळगाव निपाणी द्वितीय.खोखो मुलीधारणगाववीर प्रथम,मुखेड द्वितीय.कबड्डी मुलेबोकडदरे प्रथम,सोनेवाडी बुद्रक द्वितीयकबड्डी मुलीकोकणगाव प्रथम,बोकडदरे द्वितीय.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक