शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पैसा सुख-समाधानाचे साधन नाही : गोविलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:52 IST

एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.  प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने कॉलेजरोड परिसरातील डिसूझा कॉलनीमध्ये आयोजित व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.७) सहावे पुष्प गोविलकर यांनी ‘श्री लक्ष्मीचे अध्यात्म’ या विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, जीवन जगण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याच्या गरजा भागविण्यासाठी त्याला काहीतरी काम करावेच लागते. त्याशिवाय त्याच्या हातात पैसा येत नाही. आपल्या संस्कृतीत लक्ष्मीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहे. धर्माने वागून अर्थ सहाय्यासाठी काम करून नंतर पुढे मोक्षाकडे जाता येते. यावेळी त्यांनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरीमधील दाखले दिले. सुख हवे असेल तर गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. गरजा पूर्ण करण्यासाठी साधने हवीत. ही साधने मिळवण्यासाठी पैशाला महत्त्व आहे. मात्र, जीवनात पैसा सेवक म्हणून चांगला आहे.  पैसा मालक बनला तर अडचणीचे व घातक ठरू शकते, असेही गोविलकर म्हणाले. आनंद व समाधान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वर्गात जाणे हे सुख ठरू शकते. मात्र आनंद नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक