शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने वसुलीसाठी बळजबरीने घेतला धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:47 IST

बेकायदेशीर क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या इसमाने हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने त्यास धमकावून बळजबरीने त्याच्या खिशातून धनादेश काढून घेतल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदवलीमध्ये पाच दिवसांपूर्वी घडली़

नाशिक : बेकायदेशीर क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या इसमाने हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने त्यास धमकावून बळजबरीने त्याच्या खिशातून धनादेश काढून घेतल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदवलीमध्ये पाच दिवसांपूर्वी घडली़ विशेष म्हणजे घटनेनंतर चार दिवसांनी गंगापूर पोलिसांनी संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला व पाच दिवसांनंतर अर्थात बुधवारी (दि़ ३१) या क्लबवर छापामारी करून २१ जुगारींना ताब्यात घेतले़ गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, लुटीचे प्रकार घडत असून, याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे़त्रिमूर्ती चौकातील अमोल फुले-भालेराव याने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ आॅक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील आनंदवलीतील स्वानंदराज संकुल, रॉयल बेकर्सवर ओम साईनाथ मित्रमंडळ ठाण्यामार्फत चालविल्या जाणाºया मनोरंजन क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी गेला होता़ यावेळी संशयित शेरू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व रिझवान जब्बार खान यांनी हरलेल्या पॉइंट रम्मीचे दहा हजार रुपये दिले नाही या कारणावरून कुरापत काढून हातपाय तोडू अशी धमकी दिली़ तसेच भालेराव याच्या खिशातील स्टेट बँक आॅफ इंडियाचा १५ हजार रुपयांचा धनादेश जबरदस्तीने काढून घेतला़या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात ३० आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर बुधवारी (दि़ ३१) या क्लबवर गंगापूर पोलिसांनी छापा टाकून २१ जुगाºयांना अटक केली़ यापैकी काहींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, उर्वरित नऊ जुगाºयांची न्यायालयीन कोठडीत अर्थात नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ठाणे धर्मादाय आयुक्तांची सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन केंद्राच्या नावाखाली अध्यक्ष गंगाराम लक्ष्मण गायकवाड आपल्या चार साथीदारांसह हा क्लब चालवित होता़ संशयित गायकवाड स्थानिक लोकप्रतिनिधीचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़चेनस्नॅचिंग, घरफोडी, जबरी लुटीच्या घटनागंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत दहा दिवसांच्या कालावधीत घरफोडी, फसवणूक, जबरी चोरी यामध्ये २७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे़ वनविहार कॉलनीत वृद्धेचे १ लाख १२ हजार रुपयांचे दागिने, प्रमोदनगरमध्ये विशाल अग्रवाल यांच्या कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून ६ लाखांची रोकड, प्रसाद सर्कलजवळील मोबाइल दुकान फोडून १६ लाखांचे मोबाइल, आकाशवाणी टॉवरजवळ पादचारी महिलेची ३० हजारांची पोत, दोन घरफोड्यांमध्ये तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे़पोलिसांची दादागिरीगंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी मेडिकलचालकावर दादागिरी करण्यात मोठे शौर्य गाजविल्याचा आविर्भाव आहे़ या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक नेमके काय काम करते याचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जातो की नाही याबाबतही साशंकता आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी