नाशिक : पळसे येथील रहिवासी नारायण हिरामण जाधव हे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सीबीएस स्थानकावर उभे होते़ यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या दोघांनी गोड बोलून पैसे डबल करून देतो, असे सांगितले़ या दोघांच्या बोलण्याला भुलून जाधव यांनी स्वत:जवळील एक लाख रुपये त्यांच्या हवाली केले़ पैसे घेऊन हे दोघेही या ठिकाणाहून पसार झाले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पैसे डबलच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक
By admin | Updated: May 15, 2014 22:26 IST