शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

सोमवार ठरला ‘आंदोलन’ वार

By admin | Updated: October 27, 2015 00:01 IST

कॉँग्रेसचे धरणे : राष्ट्रवादीचा थाळीनाद; घरकुल, धान्यासाठी निदर्शने

नाशिक : वरणातून गायब झालेल्या तूरडाळीमुळे कॉँग्रेसचे धरणे आंदोलन, महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला थाळीनाद, महापालिकेच्या घरकुलाचा ताबा मिळावा, तसेच रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या निदर्शन आंदोलनांनी सोमवार चांगलाच गाजला. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. कॉँग्रेसचे धरणे आंदोलनवाढत्या महागाईत केंद्र व राज्य सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून शहर-जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन दुपारी शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना मागणीचे निवेदनही सादर केले. त्यात म्हटले आहे की, जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला महागाई कमी करण्यास वेळ मिळालेला नाही, परिणामी ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वस्त दरात धान्य दुकानांमधून पुरेशा प्रमाणात डाळी व धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात आमदार निर्मला गावित, शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर, हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, पांडुरंग बोडके, हनिफ बशीर, उद्धव पवार, सुरेश मारू, अ‍ॅड. विक्रांत माने, विमलताई पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचा थाळीनादवाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत, राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री चुंभळे, सत्यभामा गाडेकर, कविता कर्डक, सोमनाथ खताळे, विष्णुपंत म्हैसधुणे, दीपक वाघ, तानाजी गायधनी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)