शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील मठ, मंदिरांत गुरु पौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:04 IST

पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देगुरुप्रतिमेचे पूजन : मोजक्या भाविकांची उपस्थिती; घरोघरी धार्मिक सोहळ्यांनी गुरूंचे स्मरण

पंचवटी : पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. पेठरोड येथील कैलास मठ भक्तिधाम येथे रविवारी सकाळी कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते गुरू प्रतिमापूजन, अभिषेक पूजन व महाआरती करण्यात आली.साध्या पद्धतीने यंदा गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मोजक्या भाविकांनी हजेरी लावली होती. सकाळी मुख्य मंदिरात पूजन करून अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदानी पौरोहित्य केले. जुना आडगावनाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरातदेखील कोरोना पार्श्वभूमीवर बोटावर मोजता येईल इतक्या हनुमानभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळी महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते पंचमुखी हनुमान मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येऊन अभिषेक, हवन करण्यात आला. त्यानंतर आद्य जगद््गुरू रामानंदचार्या महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती झाली. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी आपाल्या गुरुंचे पूजन केले. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण तीर्थ आश्रमात यंदा साध्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळी स्वामी रामतीर्थ महाराज यांच्या हस्ते मंदिरात पूजन व महाआरती करण्यात आली. औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपूजन सोहळा संपन्न झाला. सिद्धिविनायक मानवकल्याण मिशनच्या वतीने गुरूपूजन व यावेळी स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांचा फेसबुक पेजवर लाइव्ह आशीर्वचन सोहळा पार पडला.

टॅग्स :NashikनाशिकGuru Purnimaगुरु पौर्णिमा