शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महामार्गाच्या दुरुस्तीला अखेर लागला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 20:42 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर काही दिवसांपासून माणिकखांब, बोरटेंभे, सारख्या विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला. खासदार हेमंत गोडसे यांचा अल्टिमेटम, मनसे व आदिवासी संघटनेने आंदोलनाचा दिलेला इशारा, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल व्यक्त केलेले आश्चर्य आणि ह्यलोकमतह्णने टाकलेला प्रकाश या साऱ्या घडामोडीनंतर अखेर टोल प्रशासनाने महामार्गावरील रस्त्याचे काम हाती घेतले असून खड्डे बुजवायला अखेर मुहूर्त लागला आहे.

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्ग : टोल प्रशासनाकडून रस्त्यांची कामे सुरू

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर काही दिवसांपासून माणिकखांब, बोरटेंभे, सारख्या विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला. खासदार हेमंत गोडसे यांचा अल्टिमेटम, मनसे व आदिवासी संघटनेने आंदोलनाचा दिलेला इशारा, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल व्यक्त केलेले आश्चर्य आणि ह्यलोकमतह्णने टाकलेला प्रकाश या साऱ्या घडामोडीनंतर अखेर टोल प्रशासनाने महामार्गावरील रस्त्याचे काम हाती घेतले असून खड्डे बुजवायला अखेर मुहूर्त लागला आहे. घोटी सिन्नर फाटा, न्हाईडीचा डोंगर, फूड प्लाझा, पिंप्री सदो बायपास ते कसारा घाट या विविध ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे.मुंबई - आग्रा महामार्गावरील गेल्या दोन महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे नाहक जीव जात होते. बहुतांश नागरिक अधू झाले. दररोज गाड्या नादुरुस्त होत होत्या. वाढत्या खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाल्याने वाहन चालकांचे कंबरडे मोडले होते. कसारा घाट ते वाडीवऱ्हे दरम्यान रस्त्यावरील खड्डे डोकेदुखी बनली होती. इगतपुरी तालुका हद्दीतील झालेल्या ह्या खड्ड्यांकडे हेतुपुरस्सररित्या डोळेझाक केल्या जात असल्याचे निदर्शनास येत होते. या महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या टोल प्रशासनाने कुठल्याही उपयोजना आखल्या नसल्याने त्या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महामार्गावरील खड्डे, दिशादर्शक फलक, दुभाजकावरील वाढलेली झाडे, स्पीडब्रेकर, व्हाईट साईड पट्टी, साईडपट्ट्या मजबूत करणे, वळणे, धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे, उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने विविध ठिकाणी रेडियम लाईट अशा विविध आवश्यक बाबींची प्रशासनाने पूर्तता केल्यास भविष्यातील अपघात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या ठिकाणी उपाययोजनांची गरजमहामार्गावरील वाडीवऱ्हे बायपास, गोंदे फाटा, रोठे कंपनीसमोरील पूल, पाडळी फाटा, जिंदाल पूल, मुंढेगाव फाटा, माणिकखांब येथील दोन वळणमार्ग, रेल्वे पूल,सिन्नर फाटा ते टोल नाका, बोरंटेभे फाटा, इगतपुरी बायपास रेल्वे पूल, इगतपुरी बायपास ही अपघाताची क्षेत्र बनले आहेत. याठिकाणी उपाययोजनांची गरज आहे.फोटो- २६ महामार्ग वर्क-१

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार