शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुसळगाव पोलिसांकडून कारखान्यातील चोरीचा छडा; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:50 IST

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील आटोकॉम्प इंडिया प्रा. लि. या कारखान्यातून कॉपर पाइप आणि अ‍ॅल्युमिनियम वेल्ड योकमचे बॉक्स असा सुमारे चार लाख ९८ हजार ९८३ रूपये किमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रतन चिमा माळी (२४), संजय कोंडाजी माळी (२२, दोघे रा. पास्ते, ता सिन्नर), अजय बापू चव्हाण (२२, रा. मोहदरी) व पंकज राममुर वर्मा (२२, रा. चिंचोली फाटा, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. माळेगाव औद्योगिक वसाहतीत प्लॉट नं. १८४/१८५ मध्ये आटोकॉम्प इंडिया प्रा. लि. हा कारखाना असून १६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कारखान्याच्या स्टोअर रूमध्ये ठेवलेले ४ लाख २६ हजार ३६९ रूपये किमतीचे ५१८ किलो वजनाचे ४ कॉपर पाइप तसेच ७२ हजार ६१४ रूपये किमतीचे १० अ‍ॅल्युमिनीयम वेल्ंिगचे बॉक्स असा सुमारे ४ लाख ९८ हजार ९८३ रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता. कंपनीचे भांडर व्यवस्थापक देवीदास पुंजाराम अहेर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, उपनिरीक्षक जी. पी. लावणे, हवालदार राम भवर, लक्ष्मण बदादे, पोलीस शिपाई श्रीराम हरळे, नितीन सांगळे यांच्या पथकाने चोरीचा तपास करीत संशयित रतन माळी, संजय माळी, अजय चव्हाण, पंकज वर्मा यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी