शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

बंदुकीचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:47 IST

किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरून आठ जणांनी संगनमत करून महिलेचा विनयभंग करीत बंदुकीचा धाक दाखवून २५ हजारांची रोकड जबरी चोरी करुन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किल्ला पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. २० मे २०१८ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हिरापुरा जैतुनअब्दुल कादीर मशिदीच्या गल्लीत ही घटना घडली. याप्रकरणी शाहीदा मोहंमद इम्रान कादीर (३८) या महिलेने काल फिर्याद दिली. फिर्यादी महिलेचा मुलगा अदनान समीर हा जैतुन अब्दुल कादीर मशिदीत नमाज पठणासाठी गेला असता त्या ठिकाणी झालेल्या किरकोळ भांडणावरुन शकीला नावाच्या महिलेच्या मुलाने फिर्यादीच्या मुलास मारहाण केली, असे तो घरी येऊन सांगत असताना शेख फिरोज शेख कलीम ऊर्फ गांजावाला व त्याच्या सोबतच्या सात जणांनी संगनमत करून अनाधिकाराने फिर्यादीचा हात धरुन फिरोज शेख याने तिचा विनयभंग केला. त्याच्या एका साथीदाराने बंदूक फिर्यादीस दाखवून कपाटातील २५ हजारांची रोकड काढून घेतली व अन्य दोन जणांनी आम्ही आमचे कपडे फाडून घेऊन तुझ्या नवऱ्यास खोट्या केसमध्ये फसवून देऊ असे म्हणून ५० हजारांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर तुझ्या घरावर कब्जा करू, असे म्हणत शिवीगाळ केली.चेहºयावर सुरीने वार केल्याने एक जखमीमालेगाव : शिवीगाळ करू नको असे सांगितल्याचा राग येऊन अमीन यामीन ऊर्फ अबु रा. इस्लामाबाद सिद्धार्थवाडी याने अब्दुल रज्जाक अन्वर खान (५२) या इसमाच्या चेहºयावर सुरीने वार करुन जखमी केले. याप्रकरणी अब्दुल रज्जाक यांनी किल्ला पोलीसात फिर्याद दिली. फिर्यादीचा मुलगा शकील याच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास इस्लामाबाद सिद्धार्थवाडी येथे घडली होती.मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहनमालेगाव : येथील मोतीबाग नाका रिक्षा स्टॅँडवर रस्त्याचे कडेला अनोळखी इसम १७ नोव्हेंबर रोजी पहाटे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. वय ६५ ते ७० वर्ष, नाव, गाव समजून आले नाही. उंची ५ फूट ३ इंच, रंग काळा-सावळा, शरीराने हडकुळा, कपडे भुरकट रंगाचा व उभ्या पांढºया रंगाचे लाईनचा फुल बाहीचा शर्ट व निळसर रंगाची फुलपॅण्ट डोक्यास व दाढीला पांढरे केस वर्णनाच्या इसमाबाबत छावणी पोलिसांशी संपर्क साधावा

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी