मालेगाव : तालुक्यातील गारेगाव येथील ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने व नारायण बाळू पवार यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला ही बसस्टॅण्डवरून शेतात जात असताना मुरलीधर पवार याने दुचाकीवरून येऊन हात धरून झटापट करीत विनयभंग केला. सदर प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या पीडित महिलेचा मुलगा व पतीला मुरलीधर पवार, नारायण बाळू पवार, सोनी नारायण पवार, मुरलीधरची पत्नी, निंबा पवारची मोठी मुलगी व निंबा पवारची पत्नी असे सहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली म्हणून विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर नारायण बाळू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रमिला शिवाजी देसले, जितेंद्र शिवाजी देसले, शिवाजी महादू देसले व चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच इसमांनी नारायण पवार व त्यांच्या सोबत असलेल्या मुरलीधर पवार याने महिलेचा हात धरला अशी कुरापत काढून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच मुरलीधर पवार यांच्यावर पेट्रोल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. निंबा पवार यांच्या दुचाकीची मोडतोड केली म्हणून प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील व हवालदार सोनवणे करीत आहेत.
गारेगाव येथे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:10 IST
मालेगाव : तालुक्यातील गारेगाव येथील ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारीचा प्रकार घडला.
गारेगाव येथे महिलेचा विनयभंग
ठळक मुद्देदुचाकीवरून येऊन विनयभंग केलालाठ्याकाठ्यांनी मारहाण केली