नाशिक : घराजवळील शेडमध्ये झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा तीस वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास लाखलगाव परिसरात घडली़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री लाखलगाव परिसरातील अल्पवयीन मुलगी शेडमध्ये एकटी झोपली होती़ याचा फायदा घेत रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित नासिर शेख (३०, रा. लाखलगाव) याने मुलीचा विनयभंग केला़ हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केल्याने संशयित फरार झाला़या प्रकरणी आडगाव पोलिसांनी नासिर शेख विरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन युवतीचा विनयभंग
By admin | Updated: May 19, 2017 17:08 IST