इंदिरानगर : तपासणीच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने रुग्णालयात काम करणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली असून, संशयित राहुल नरेश पाल (२०, रा़ पवननगर, सिडको) यास न्यायालयाने सोमवार दि. १९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इंदिरानगर परिसरातील दंत रुग्णालयात सशंयित राहुल पाल हा गुरुवारी (दि़ १५) दुपारच्या सुमारास तपासणीच्या बहाण्याने गेला होता़ त्याने या ठिकाणी कामास असलेल्या युवतीकडे मोबाइल क्रमांकाची मागणीची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला, मात्र यास तरुणीने नकार देताच तिचा विनयभंग केला़ (वार्ताहर)
रुग्णालयातील युवतीचा विनयभंग
By admin | Updated: October 16, 2015 21:30 IST