शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बोलठाण येथे एटीएममध्ये मोकाट जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:31 IST

नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळील एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत असुन पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात.

नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळील एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत असुन पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात. या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला होता, परंतु त्याचे मासिक वेतन थकल्यामुळे त्याने दिड वर्षापासून काम सोडून निघून गेला असल्याचे समजते. तेव्हापासून जेऊर रस्त्यालगत असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळ असलेल्या एटीएम मशीनला सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून रक्षण करण्यासाठी आणि पावसाळ्यात पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना अगोदर या मोकाट जनावरांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. त्यानंतर पैसे काढता येतात. सध्या एटीएम मशीन असलेल्या ठिकाणपासुन अगदी पंधरा फूट अंतरावर येथे बँकेची शाखा सुरू झाली. परंतु सन २०१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी झाली तेव्हा बँक नवीन जागेत अर्धा किमी अंतरावर स्थलांतरीत झाली. तेव्हापासून एटीएम मशीन दुर्लक्षित झाले. सध्या एटीएम मोकाट जनावरांचा अड्डा बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक