शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोहपाडा-हतगड रस्ता : जीप, दुचाकीची समोरासमोर धडक; पाच जखमी सुरगाण्याजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:25 IST

सुरगाणा : चिराई घाटाजवळ रस्त्यावर झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देफरशीच्या वळणावर जोरदार धडक वाहतूक पोलीस दुर्लक्ष

सुरगाणा : तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे चिराई घाटाजवळील मोहपाडा ते हतगड या जोड रस्त्यावर सकाळीच आठ वाजेच्या सुमारास झालेल्या जीप व दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसºयाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले असून, ते बुबळी येथील रहिवासी आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. त्यांना बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडूरंग चौरे (रा. सुफले दिगर ता. कळवण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महिंद्रा मॅक्स जीपचालक महेंद्र घुले (राहणार हट्टी) हा एम.एच.१२, बी.पी- ३००२ या जीपमध्ये कांदा लागवडीसाठी काही मजुरांना अभोणा भागात सकाळी घेऊन जात होता. याच रस्त्याने हतगडकडून हिरो होंडा क्रं एम.एच. १५, बी.बी.- १७४० या दुचाकीने सोनीराम मावंजी चौरे ( वय ३५. रा. सुफले दिगर ता. कळवण) व हिराजी मंगळू पवार (वय ५५ रा. मोहपाडा खिराड) हे दोघेही कामानिमित्ताने सुरगाण्याकडे येत होते. त्यांना फरशीच्या वळणावर जीपने जोरदारपणे धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. यास चालक जबाबदार आहे अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मयत सोनीराम चौरे व हिराजी पवार हे सासरे-जावई होते. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. चालक महेंद्र घुले यास अटक केली असून, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, गोतरणे, सहारे, दवंगे आदी तपास करीत आहेत. बोरगाव ते बर्डीपाडा हा दुपदरी रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर आतापर्यंत दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या अपघात अठ्ठावीस ते तीस जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीस ते चाळीस जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. या मयतामध्ये विशेषत: अठरा ते पंचवर्षीय तरु णाईचा समावेश आहे. या राज्य महामार्गावर पोलिसांच्या आशीर्वादाने, वरदहस्ताने जागोजागी टपरीवर दमण येथील देशी, विदेशी दारू मिळत आहे. त्यामुळे तरु णाई मद्यधुंद होऊन बेदरकारपणे दुचाकी वाहने चालवत आहेत. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.