शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मोदी यांच्या सभेमुळे पेन्शनधारकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:55 IST

केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृद्ध सदस्यांची प्रशासनाने ससेहोलपट चालविली आहे.

नाशिक : केंद्र सरकारातील एका मंत्र्याने पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी थेट पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पिंपळगावच्या सभेसमोर आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या जिल्हा ई.पी.एस. पेन्शनर्स फेडरेशनच्या वृद्ध सदस्यांची प्रशासनाने ससेहोलपट चालविली आहे. मोदी यांची सभा चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पेन्शनर्सच्या नेमक्या काय मागण्या आहेत, याबाबत प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले, परंतु त्यांची भेट घेण्याचे टाळल्याने संतापलेल्या पेन्शनर्सला नंतर मात्र पिंपळगाव पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने मात्र पेन्शनर्सला बोलावले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.ई.पी.एस. पेन्शनधारकांची पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी असून, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर ९० दिवसांत पेन्शनधारकांना कमीत कमी तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येईल, त्याचबरोबर महागाई भत्ताही देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; परंतु आता पाच वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पेन्शनधारकांनी वेळोवेळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे पिंपळगावी निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याचा निर्णय पेन्शनधारकांनी घेतला असून, तसे पत्रही त्यांनी प्रशासन तसेच पोलिसांना दिले आहे. पेन्शनधारकांच्या या आंदोलनाने सरकारविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल म्हणून पेन्शनधारकांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी सकाळी अकरा वाजता भविष्य निर्वाह निधी आयुक्त व काही पेन्शनर्सला चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. तथापि दोन तास बसूनही त्यांची भेट घेण्यात आली नाही, त्यामुळे संतापलेल्या पेन्शनर्सनी घरचा रस्ता धरला; परंतु घरी गेल्यावर त्यांच्या नावे पिंपळगावी पोलिसांची नोटीस मिळाली. या नोटिसीत मोदी यांच्या सभेत काही अनुचित प्रकार घडल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनर्स आणखीनच चिडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्यावर ते ठाम आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीnashik-pcनाशिक