येवला - नमो नम:च्या गजराने देश व्यापुन पतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी आता लग्नपत्रिकांवरही जागा घेतल्याने, भाजपचे तालुका सरचिटणीस आनंद शिंदे यांच्या लग्नाऐवजी, मोदीफेमपत्रिकेची चर्चा सर्वाधिक होत आहे.या लग्नपत्रिकेवर पहिल्या फोल्डरवर देश का गौरव होगा तो किसी को भी देश पर आँख उठाने की हिम्मत नही होगी। अशा श्लोगन व त्याखाली लक्षवेधी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्र आहे.सोशल मिडीयासह सर्वत्रच मोदीची छबी पहायला मिळत होती आता लग्न पत्रिकवरही मोदी आलेत.स्व. वामनराव शिंदे हे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक त्यांचा नातु आनंद शिंदे भाजपचा सरचिटणीस गेल्या ६ महिन्यांपासुन मोदीफेवर ने भारावलेला कार्यकर्ता आधी लग्न कोंढण्याचं मग रायबाचं या उक्तीप्रमाणे आधी नरेंद्राभिषेक नंतर शुभमंगल सावधान या निश्चियाने ३० मे रोजी विवाहबद्ध होत आहे. अवघा मित्रपरिवार, पत्रिकेत एकवटला आहे. पण मोदीची लग्नपत्रिकेवरील छबी मात्र सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
लग्न पत्रिकांवरही आता मोदींची छबी
By admin | Updated: May 29, 2014 01:05 IST