शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना सहन करणार नाही : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी

ठळक मुद्देपुस्तकावर तात्काळ बंदीची मागणी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : या अगोदर देशात काहींची तुलना कधी प्रभुराम चंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता कदापी सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्या पुस्तकाच्या प्रकाशनावर व विक्रीवरही तात्काळ बंदी घातली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

नाशिक येथे प्रसिद्धीमाध्यमांशाी बोलताना भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. ते ज्या प्रकारे कायदे करत आहे. त्यात जनहित नसून कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. जेएनयु सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्यावर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडलं नाही त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होते. त्यांच्या नावावरच निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नसल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, कुठल्याही लेखकाने भाट गिरी तरी किती करावी आणि ती करत असतांना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत याचे भान ठेवायला हवे, त्यामुळे अशा प्रकाशनांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे असे स्पष्ट मतही शेवटी भुजबळ यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक