सिन्नर : सायखेडा येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा उत्साहात समारोप झाला. खुला प्रवेश असलेल्या या शिबिरात ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बारा दिवस चाललेल्या या शिबिरात प्रशिक्षक रामनाथ रावळ यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक कागदपत्रांचा संदर्भ देत मोडी लिपीतील स्वर, व्यंजन, बाराखडी, कालगणना, रेघी हिशेब याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक डी. के. सातभाई, इतिहास विभागप्रमुख व्ही. एम. पवार, हेमंत टिळे, अश्विनी रायते, पूनम पठाडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा समारोप
By admin | Updated: February 4, 2016 22:58 IST