शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक अभियांत्रिकी नैसर्गिक संसाधनांना मारक : स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:43 IST

घर बांधण्यावर लक्ष केंद्रित करताना त्यात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पाहून ते ठरविले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत बांधकाम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आजच्या बांधकामांद्वारे नैसर्गिक संसाधनांवर घाला घातला जात आहे.

नाशिक : घर बांधण्यावर लक्ष केंद्रित करताना त्यात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पाहून ते ठरविले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत बांधकाम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आजच्या बांधकामांद्वारे नैसर्गिक संसाधनांवर घाला घातला जात आहे.  शहरांमध्ये प्रदूषण, सिमेंटचे जंगल, कचरा, कार्बनडाय आॅक्साईडचा मारा अशा आरोग्याला मारक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभियंता पी. आर. स्वरूप यांनी केले. शुक्रवारी (दि. २७) हॉटेल ताज येथे सुरू झालेल्या ‘इन्फ्रा सीई २०१८’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, नाशिक सेंटर यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळी शहर, गावांची रचना सुटसुटीत व पर्यावरणपूरक होती. आताच्या शहर विकास धोरणात या गोष्टी अगदी उलट पहायला मिळतात. भविष्यकाळात बांधकाम क्षेत्रात शाश्वत शहरीकरण या प्रणालीचा पुरस्कार झालेला पहायला मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  स्थापत्यशास्त्र अभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, शहरांची रचना ही त्यात राहणाºया लोकांना सुखसोयी देणारी, आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, राहण्यासाठी मदत करणारी असली पाहिजे; पण दुर्दैवाने या साºया गोष्टी दूर सारत पर्यावरणाला आणि त्यायोगे मानवजातीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या हानी पोहोचेल अशीच बांधकामे, शहरांची निर्मिती, विकास पहायला मिळतो आहे. भारतसह इतरही काही देशांमध्ये पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण झाले असून, शाश्वत शहरीकरण, पर्यावरणस्नेही पैलू यांचा अंतर्भाव करण्यावर आजच्या अभियंत्यांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुनीत रॉय यांनी प्रास्ताविक केले. हेमंत धात्रक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पी. सूर्यप्रकाश, सन्ना रत्नवेल, सी. एच. प्रकाश, संतोष काठे, विजय सानप आदींसह देशभरातून तज्ज्ञ अभियंते, अभ्यासक उपस्थित होते. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २८) होणार असून, या अंतर्गत तज्ज्ञांची विविध सत्रे होणार आहेत.राजीव सेठी यांचे मार्गदर्शनटीइआरआय विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. राजीव सेठी यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जागतिक पातळीवर मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढते आहे. घरे, इंधन, परिवहन अशा सगळ्याच गरजा वाढत चालल्या आहेत. त्याचबरोबर सामाजिक ताण, गुन्हे वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या गरजा कमी करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक