शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:35 IST

दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

ठळक मुद्देचालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई २० गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेफरार दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान

नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे. चालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी २० गुंड पोलिसांच्या हाती लागले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरोड्याच्या गुन्ह्यात गजानन मोतीराम कोळी, मिलनसिंग रामसिंग भादा या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून त्याच रात्री ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. कि स्मतसिंग रामसिंग भादा (२०), तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०), रामसिंग राजूसिंग जुन्नी (२५), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५, सर्व रा. मोहाडी, जि.धुळे) या संशयितांची नावे दरोड्यात निष्पन्न झाली. या सहा सराईत दरोडेखोरांनी मिळून पालघर, ठाणे, डहाणू जिल्ह्यांत घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या हाती लागलेला मिलनसिंगविरुद्ध १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, गजाननविरुद्ध ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे गुन्हेगार सराईत असून, संघटितपणे दरोडे, हाणामाऱ्या, जबरी लूटसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.फरार दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हानसातपूरच्या एटीएम दरोड्यातील फरार संशयित दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. फरार दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरीatmएटीएम