इगतपुरी : शहरातील बारा बंगला परिसरात असलेल्या एका कंपनीच्या टॉवरच्या बॅटºया कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या, सदर घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व इगतपुरी पोलिसांनी दि. ४ जुलै रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान इगतपुरी शहरातील एका संशयित भंगार व्यावसायिक इसमास ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेला इसम ताहीरअली सैफुल्ला शेख (४५), रा. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश, हल्ली राहणार धम्मगरी गेटसमोर, इगतपुरी याच्याकडे याबाबत चौकशीकेली; मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या घराची झडती घेतली असता, मोबाइल टॉवरच्या बॅटºया मिळून आल्या. सदर बॅटºया ताहीरअली याने काही दिवसांपूर्वी बाराबंगला परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीच्या ताब्यातून मोबाइल टॉवरच्या मायक्रोटेक्स कंपनीच्या २४ बॅटºया किंमत ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली सपोउनि नवनाथगुरुळे, पोलीस हवालदारशिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोलीस नाईक संदीप हांडगे, सचिन पिंगळ व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश वराडे,विनोद गोसावी यांच्या पथकाने केली आहे.
मोबाइल टॉवरच्या बॅटºया चोरणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:44 IST
इगतपुरी : शहरातील बारा बंगला परिसरात असलेल्या एका कंपनीच्या टॉवरच्या बॅटºया कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या, सदर घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाइल टॉवरच्या बॅटºया चोरणारा गजाआड
ठळक मुद्दे इगतपुरी शहरातील एका संशयित भंगार व्यावसायिक इसमास ताब्यात घेतले.