शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये मोबाइल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:56 IST

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत चालेल्या पादचाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करीत पळ काढणाºया चोरट्यांच्या गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून मुसक्या आवळल्या.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत चालेल्या पादचाऱ्यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करीत पळ काढणाºया चोरट्यांच्या गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अमोल बाबूराव पाटील (२३ शिवपुरी चौक, अंबड) हे कंपनीच्या कामानिमित्त वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी पाठीमागे बसलेले इसमाने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने जवळच गस्त घालत असलेल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश जगदाळे, दत्तात्रय पाळदे, संदीप लांडे, जावेद खान, त्यांनी दुचाकीवरील चोरट्यांचा कलानगर, राजसारथी सोसायटीमार्गे पाठलाग करून रथचक्र चौकातील एका प्लॉटमध्ये लपण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या.  या दोघाही चोरट्यांची पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर प्रदीप सरबजीत थापा (१८) व त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक