चांदवड येथे मोबाइल अॅपचे प्रदर्शनचांदवड : येथील एसएनजेबी संचलित कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय व चतुर्थ वर्ष संगणक शाखेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अॅण्ड्रॉइड अॅपचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी विनजीत टेक्नॉलॉजी नाशिक व टेक्नोक्राफ्ट फोरम, नाशिक येथील मान्यवर केतन लोहार व स्वप्नील सोनकांबळे हे परीक्षक म्हणून लाभले. सदर प्रदर्शनासाठी संगणक शाखेतील विद्यार्थ्यांनी मागील तीन महिन्यांपासून कठीण परिश्रम घेतले व एकूण तेरा मोबाइल अॅप्लिकेशन बनविले. यातून एकूण तीन अॅप्लिकेशनची निवड करण्यात येऊन त्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक सीडीएमएटीएम लोकेटर या अॅपला मिळाले. त्यासाठी जुनेद शेख, मनीष बूब, रुचिता छाजेड व रोशनी चोरडिया या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच द्वितीय क्रमांक कॅश डिपॉझिट लोेकेटर या अॅपला मिळाले. त्यासाठी धनश्री पाटील, दर्शन बागरेचा, तृप्ती लुल्ला, मेघा भटेजा यांनी परिश्रम घेतले. तृतीय क्रमांक विमलविद्या भक्ती संगीत या अॅपला देण्यात आला. त्यासाठी कमलेश जैन, उमेशकुमार जैन यांनी मेहनत घेतली. सदर अॅपच्या मार्गदर्शनासाठी पुणे येथील स्पार्क टेक्नॉलॉजी या संस्थेचे गौरव लोणकर व समीर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. कोमल चोप्रा यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, डॉ. एम. आर. संघवी, संगणक विभागप्रमुख प्रा. श्रीमती के. एम. संघवी, टी.एन.पी. आॅफिसर पंकज कापसे, प्रा. राजीव भंडारी, प्रा. घनश्याम ढोमसे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
चांदवड येथे मोबाइल अॅपचे प्रदर्शन
By admin | Updated: October 13, 2016 00:15 IST