शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

‘मनसे’ला नाकारत सर्वसमावेशकतेला कौल

By admin | Updated: October 21, 2014 01:56 IST

‘मनसे’ला नाकारत सर्वसमावेशकतेला कौल

 

किरण अग्रवालभाजपासह अन्य सर्व पक्ष चालतील, अगदी डावे मार्क्सवादींचेदेखील वावडे नाही, पण ‘मनसे’ नको; असाच कौल नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी देऊन बहुपक्षीय संधीचा जणू समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. केवळ तितकेच नव्हे तर, मतदारांना गृहीत धरून आपले राजकारण रेटणाऱ्या प्रस्थापितांनाही या निकालाने जमिनीवर आणून ठेवले आहे.नाशिक जिल्ह्यातील निकाल फार काही अनपेक्षित लागले असे नाही. कारण, मोदी माहात्म्यामुळे ‘भाजपा’च्या जागा वाढणार होत्याच. अपेक्षेप्रमाणे शहरी मतदारांवर चाललेल्या त्यांच्या गारुडाप्रमाणे नाशिक महानगरातील तीनही जागांवर भाजपाने कब्जा केला. शिवाय, चांदवडची जागाही आपल्याकडे खेचून जिल्ह्यात ‘चौपट’ यश मिळविले. यापेक्षा जास्तीची अपेक्षा खुद्द भाजपालाही नसेल. गेल्या २००९ मध्ये त्यांच्या हाती केवळ बागलाणची एकमेव जागा आली होती. दुसरी अपेक्षित बाब होती ती ‘मनसे’च्या सफायाची. नाशिक महापालिकेतील सत्तेच्या निमित्ताने या पक्षाचा व त्याच्या नेतृत्वाचाही फोलपणा ढळढळीतपणे समोर येऊन गेला होता. ब्ल्यू प्रिंटच्या नावाखाली दिवस ढकललेल्या व थांबा, वाट पहाचे सल्ले देत वेळकाढूपणा केलेल्या राज ठाकरेंचा करिष्मा ओसरल्याचे गेल्या लोकसभा निवडणुकीतच उघड होऊन गेले होते. त्या निवडणुकीत ‘मनसे’च्या उमेदवाराला अनामत रक्कम गमवावी लागल्याची नामुष्की पाहता विधानसभेच्या या निवडणुकीत यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षाच नव्हती. यातही गेल्यावेळी निवडून आलेल्या तिघांपैकी दोघांनीच यंदा उमेदवारी केली, त्यातीलही वसंत गिते यांच्याबद्दलच काहींना थोडीफार आशा होती. मात्र जुन्या नाशकातील मतांचे विभाजन या परिसरातीलच मूळ रहिवाशी असलेल्या अन्य उमेदवारांमध्ये होत असताना भाजपाच्या सौ. फरांदे यांचा मार्ग आपसूकच मोकळा होत गेला. नाशिक (पश्चिम)मध्येही मतदारांनी सातपूर-सिडको वा कसमादेच्या प्रादेशिक वादाची गणिते तर उलथवलीच शिवाय अन्य प्रबळांच्या झुंजीत भाजपासाठीची एकगठ्ठा मते सौ. सीमा हिरेंना विजयाप्रत घेऊन गेलीत. परिणामी दोन्ही ठिकाणी ‘मनसे’चे इंजिन बंद पडले. तेव्हा, ‘ये तो होनाही था’ असेच या निकालांचे वर्णन करता येणार आहे.राज्यात नाशिकचा आवाज भुजबळांमुळे ओळखला जातो. त्यांच्याही निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असले तरी त्यांच्या विजयाची कुणालाच चिंता नव्हती. तशी भक्कम तटबंदी त्यांनी करून ठेवली होती. चिंता होती त्यांना ती पुत्र पंकजची. पण, तेथील विकासाच्या मुद्द्यापुढे मोदी व बुलेट फॅक्टरही फिके पडलेत. भुजबळांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी एक मात्र समाधानाची बाब ठरली ती म्हणजे, एकूणच राज्यात सत्ताधारी व त्यातही राष्ट्रवादीसाठी नकारात्मक वातावरण असताना नाशिक जिल्ह्यात या पक्षाला बागलाणची एक जास्तीची जागा पदरात पडली. तर कळवणच्या बदल्यात लगतची दिंडोरीची जागा पूर्ववत या पक्षाने आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने जिल्ह्यात स्थिती सुधारली असेच म्हणता यावे.काँग्रेसचीही स्थिती वाईट राहिली नाही. सिन्नरऐवजी मालेगाव (मध्य) च्या जागेचा बदल वगळता या पक्षाने आपला गेल्यावेळेचा दोन जागांचा कोटा कायम राखला. मालेगाव (मध्य)मध्ये धर्माधिकार असलेल्या मौलाना मुफ्ती यांनी राजकीय लाभासाठी पक्ष बदल केला असला तरी त्यांची कारकीर्द प्रभावी ठरू शकलेली नव्हतीच. ‘एमआयएम’च्या उमेदवारानेही तेथे मतविभाजनात भर घातल्याने काँग्रेसच्या आसिफ शेख यांचा मार्ग मोकळा झाला. इगतपुरीत काँग्रेसच्या विद्यमान सौ. निर्मला गावित यांच्यापुढे स्वपक्षीयांच्याच असहकाराचे आव्हान जरी होते तरी, काशीनाथ मेंगाळ यांच्या अपक्ष उमेदवारीसोबतच इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यातील अस्मितेतून घडलेले मतविभाजन गावितांच्या पथ्यावर पडले. काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही आपल्या चार जागांचा कोटा राखला, फक्त एक जागा बदलली तर एका ठिकाणी चेहरा बदलला. मालेगाव (बाह्य) व निफाड राखतानाच दिंडोरीच्या बदल्यात सिन्नरची जागा अपेक्षेप्रमाणे राजाभाऊ वाजे यांनी खेचून घेतली तर देवळालीत बबन घोलप यांच्याऐवजी त्यांचे पुत्र योगेश यांनी गड राखला, हे निकालही अपेक्षित होतेच. माकपाचे जे.पी. गावित यांनी मात्र ज्येष्ठ नेते पवार यांना पराभूत करीत जिल्ह्यात आपल्या पक्षाचे पुनरागमन केले. गेल्यावेळी ‘एटीं’मुळेच गावितांना विश्रांती घ्यावी लागली होती. महत्त्वाचे म्हणजे, पक्षीय पातळीवर भाजपाने आघाडी घेऊन राष्ट्रवादीनेही एक पाऊल पुढे टाकले असताना आणि शिवसेना तसेच काँग्रेसने आपला ‘आकडा’ टिकवला असताना काही प्रस्थापितांना मात्र मतदारांनी थांबण्याचा कौल दिला. सिन्नरला वाजे यांना प्रतिस्पर्धी म्हणून जमेतच न धरणाऱ्या कोकाटेंना वाजेंनीच अस्मान दाखविले. कळवणमध्ये ‘ए.टी’, चांदवडमध्ये कोतवाल पराभूत झाले. गेल्यावेळीच नाकारले गेलेले माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी महापौर दशरथ पाटील यंदाही झिडकारले गेलेत.