शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यास मनसेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:43 IST

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भोजापूर धरणातून पाणी सोडण्यास विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.तालुक्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षा अतिशय भयावह दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. येणाºया काळात त्याचा परिणाम गंभीर होणार असल्याने भोजापूर धरणारच्या पाण्यावर तालुक्याच्या नजरा आहे. त्यामुळे धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठी भविष्यसाठी जपून ठेवण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी पिकांची पेरणी होवू शकत नाही. १२ दिवसाच्या पाण्याच्या आवर्तनाने कोणत्याही शेतकºयाचा फायदा होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची सोय नसतांना देवू केलेल्या पाण्याचे आवर्तन सोडून कोणाला फायदा होणार तसेच हे पाणी टॅँकर आणि पेयजल योजनेतून पुरविल्यास संपूर्ण तालुक्याला पुढील सहा महिने उपयोगात येवू शकते असे निवेदानात म्हटले आहे. काही राजकीय नेत्यांनी भविष्याचा विचार न करता आवर्तन सोडण्याची निर्णय घेतला आहे. जरी आवर्तन सोडले तर भविष्यात दुष्काळाची स्थिती अधिक भयावह होणार असल्याने तहसीलदार गवळी यांनी स्वत: लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी