शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

नाशकात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजार समिती, भाजी मंडईत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:47 IST

व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देबाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात ह्यभारत बंदह्णला संमिश्र प्रतिसाद बघावयास मिळत आहे. नाशिक शहरातील पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डसह लासलगाव बाजार समिती, निफाड, सायखेडा बाजार समिती, येवला बाजार समितीमध्ये आज सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत आहे. सर्व व्यवहार ठप्प असून शेतकऱ्यांनी कुठल्याहीप्रकारचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये पोहचविला नाही.

दिल्ली येथे शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयक मगे घेण्याच्या मागणीसाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.८) 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या भारत बंदला विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध गावागावांमध्ये प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गोदाकाठालगत सुमारे ४२ गावांमध्ये बंद यशस्वी होत आहे. गावांमधील शेतमालाचे सर्व व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहे. बाजारपेठांमध्ये निरव शांतता पहावयास मिळत आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. शेताचे बांधसुध्दा ओस पडलेले दिसत आहे, कारण शेतमालाचा उठाव होणार नसल्याने शेतमजूर, शेतकरी वर्ग बांधावर फिरकला नाही. ग्रामीण भागात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात व दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, छावा, व्यापारी महासंघ,कांदा उत्पादक संघटना, माथाडी कामगार यांनी आज कळवण बंदच्या आवाहनास मेडिकल व वैद्यकीय ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वं व्यापारी व व्यावसायिक बांधवानी प्रतिसाद देऊन शंभर टक्के बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कळवण बाजार समिती अंतर्गत कळवण, नाकोडा, अभोणा व कनाशी येथील आवारात कांदा व भुसार लिलाव बंद ठेऊन भारत बंदला पाठिंबा दिला.दरम्यान तहसीलदार बी ए कापसे यांना बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार, शेतकरी नेते गोविंद पगार, वसाका बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे, रिपाईचे सुनील बस्ते, टिनू पगार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देत केंद्र सरकारच्या कृषी कायदाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.केंद्राच्या कृषी कायदा विरोधी शेतकऱ्यांनी पुकारलेला बंद नाशकात यशस्वी होताना दिसत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर बाजारसमिती संचालक मंडळ, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदिवला. दिंडोरी त

 

 

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संपBharat Bandhभारत बंदAgriculture Sectorशेती क्षेत्र