शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

मोबाइल कंपन्यांना मनपाचा दणका

By admin | Updated: March 21, 2017 00:50 IST

टॉवर्स सील : थकबाकी न भरल्यास घरमालकांकडून वसुली

नाशिक : महापालिकेने मिळकत कर थकविणाऱ्या विविध मोबाइल कंपन्यांचे सुमारे २७ टॉवर्स सील केले आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांमार्फत देण्यात येणारी इंटरनेट व मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर काही कंपन्यांनी थकबाकीचा भरणा केला आहे मात्र, ज्या कंपन्या थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या थकबाकीची रक्कम संबंधित घरमालकांकडून वसूल केली जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेने मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. त्यात मोबाइल कंपन्यांनी ठिकठिकाणी उभारलेल्या टॉवर्सचीही सुमारे ६ कोटी रुपये थकबाकी आहे. शहरात सुमारे २०० टॉवर्स आहेत. त्यात महापालिकेने आतापर्यंत २७ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई करत सील ठोकले. त्यात जीटीएल, एअरसेल व एटीसी कंपन्यांचा समावेश होता. यापूर्वी महापालिकेने बजावलेल्या नोटीसांनुसार आयडिया कंपनीने २४ लाख रुपये तर इंडस कंपनीने २४ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. तसेच एटीसी कंपनीने येत्या २३ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी महापालिकेला दिली आहे. शहरात एटीसी कंपनीचे ४२ मोबाइल टॉवर्स असून, त्यातील १५ टॉवर्स महापालिकेने सील केले होते. याशिवाय, इंडस, रिलायन्स व रिलायन्स जीओ या कंपन्यांनीही २२ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी दिली आहे. सदर कंपन्यांनी मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांचेही टॉवर्स सील केले जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने मोबाइल टॉवर्स सील करण्याची कारवाई केल्याने अनेक भागात मोबाइल व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका नाशिकरोड भागात बसल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)