शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत किरकोळ कारणावरून मित्रांनी केला मित्राचा खून, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:20 IST

दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे नाव आहे.

दिंडोरी : मोबाईल चोरल्याच्या आरोपावरून कट रचून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी एका मित्रास धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत जीवे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. सचिन बगर असे मृताचे नाव आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील सचिन राजाराम बगर (२२) यास त्याचा मित्र पोपट जगन बेंडकुळे याने घरातूनगुरु वारी रात्री आठ वाजता बाहेर घेऊन गेला. त्यांचे सोबत दीपक बाळू बेडकुळे, योगेश भास्कर बेडकुळे हे ही सोबत होते. पोपटचा मोबाईल सचिनने चोरल्याचा संशय होता. यावरून सचिनला तिघे तुंगलदरा गवळवाडी रस्त्यावर गवळवाडी शिवारात गवताच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांचेत वाद होऊन सचिनला धारदार शश्राने गळ्याव वार करत गंभीर जखमी केले त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून मोटारसायकलवर मोहाडी साकोरे रस्त्यावरील कुर्णोली शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिले. दरम्यान रात्री पोपट बेडकुळे याने हा घरी प्रकार सांगितल्यावर पहाटे पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेत मृतदेह शोधून काढत पंचनामा केला.पोलीस उपअधीक्षक देविदास पाटील,पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. दिंडोरी पोलिसांनी तिघा आरोपींविरु द्ध भादवी गुन्हा दाखल करत अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी करत आहे. सचिन बगरच्या पश्चात आई, वडील,भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक