नाशिक : महापालिकेतील कामात सुसूत्रता येण्यासाठी कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संवाद राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अश्लील संदेश पाठविल्याने त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. पंचवटीतील आरोग्य विभागात काम करणाऱ्या नारायण जाधव या कर्मचाऱ्याने व्हॉट्स अॅपचा गैरवापर करीत हे संदेश पाठविले होते. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबद्दल पालिकेत चर्चा सुरू होती. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना सुनावले होते. अखेर या प्रकरणी काही महिला भद्रकाली पोलिसांत गेल्यानंतर हा प्रकार आयुक्तांच्या कानावर घालण्यात आला आणि आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकेंद्रीकरणाअंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करण्याची सूचना केल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. (प्रतिनिधी)
व्हॉट्स अॅपचा गैरवापर;
By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST