लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घोटीहुन गावठी हातभट्टीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पीकअप जीपला मुंबई नाका येथे गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले. जीपमधून सुमारे ८० लिटर दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला. यावेळी घोटीकडून द्वारकेच्या दिशेने जाणारी महिंद्र पीकअप जीप (एमएच १५, डीके ३६४७) मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली आली असता पोलिसांनी तिला अडविले. जीपमधून हातभट्टीपासून तयार केलेली सुमारे ८० लिटर दारू पोलिसांनी हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली जीपही जप्त केली आहे. एकूूण तीन लाख आठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच जीपमधील चालक वैभव सुरेश डुकरे (२७), विजय हिरालाल जाधव (३५), सुनील गायकवाड (३०. सर्व रा. फुलेनगर) या तिघांना ताब्यात घेतले आहे. वर्षभरापूर्वीदेखील अशाच पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू वाहनांच्या ट्यूबमध्ये भरून नाशिकमध्ये घोटीहुन आणली जात असताना त्या टाटा सुमोला वाडीवऱ्हे जवळ अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या सुमोचालक व त्याच्या साथीदाराचा मृत्यू झाला होता.
मुंबई नाक्यावर हात भट्टीची दारू जप्त
By admin | Updated: May 15, 2017 01:16 IST