शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
4
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
5
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
6
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
7
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
8
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
9
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
10
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
11
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
12
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
13
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
15
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
16
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
17
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
18
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
19
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
20
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

मिशन राष्टय; डॉक्टरांना मिळेना अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:38 IST

ष्टय बाल आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेबाबत नवीन नियमावली आली आणि डॉक्टरांच्या अस्तित्वाची चर्चा सुरू झाली. या अभियानात कार्यरत असलेले डॉक्टर्स अंगणवाडी आणि शाळांमधील शून्य ते १८ वयोगटांतील बालकांची आरोग्य तापसणी करून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. संबंधित रुग्णावर उपचार, शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो.

ष्टय बाल आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेबाबत नवीन नियमावली आली आणि डॉक्टरांच्या अस्तित्वाची चर्चा सुरू झाली. या अभियानात कार्यरत असलेले डॉक्टर्स अंगणवाडी आणि शाळांमधील शून्य ते १८ वयोगटांतील बालकांची आरोग्य तापसणी करून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. संबंधित रुग्णावर उपचार, शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. सेवा आणि सद्भावना अशा दोन्हींच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी म्हणूनही रुग्णाच्या आरोग्याची काळजी हे डॉक्टर्स आजवर घेत आहेत. राज्य आर्थिक पाहणी अहवालामध्येदेखील सदर कार्यक्रमाची नोंद घेण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या सर्व प्रकारच्या आरोग्याशी संबंधित तसेच यात्रा, जत्रांमधील आजारांवरील नियंत्रणापर्यंत संपूर्ण जबाबदारी सांभाळूनही आरोग्यसेवेच्या मूळ प्रवाहातून मात्र राष्ट्रीय बाल आरोग्य मिशनचे डॉक्टर्स दुर्लक्षितच आहेत. त्यांच्या कामाचे, श्रमाचे थेट श्रेय त्यांना मिळत नाहीच, गावकुसातील खेड्यातील अखेरच्या मुलापर्यंत हे डॉक्टर्स पोहोचण्याचे सेवाव्रती कार्य पार पाडत असताना अजूही हे डॉक्टर्स अस्तित्वाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे कार्य आणि त्यांच्या प्रश्नांसंदर्भात साधलेला संवाद...अन्य राज्यांत सन्मान,आपल्याकडे का नाही?राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानात काम करणाºया महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि अन्य राज्यांमधील याच मोहिमेतील डॉक्टरांच्या सेवासुुविधांमध्ये मोठी तफावत आहे. आजही राज्यातील या मोहिमेतील डॉक्टरांना अपेक्षित अस्तित्व लाभलेले नाही किंबहुना तसे महत्त्व दिले जात नाही. दुर्गम भागातील बालकांची आरोग्य सेवा तसेच आरोग्य विभागातील कोणत्याही मोहिमेत सदर डॉक्टर योगदान देत असतानाही त्याचा थेट लाभ आणि श्रेय मिळत नाही. मानधनावरील नोकरी असल्याने अनिश्चिततेचे सावट असल्याने गोंधळाची परिस्थिती कायम आहे. नोकरीची हमी नाही, पगारही कमी, कुणी लोनही देत नाही अशा परिस्थितीतही बाल आरोग्य मिशनची सेवा अविरत सुरू आहे. शासनाने डॉक्टर म्हणून असलेला सन्मान तरी दिला पाहिजे.- डॉ. नीलिमा बच्छावबाल आरोग्य मिशन डॉक्टर्स प्रवाहापासून दूरबाल आरोग्य मिशनमध्ये सेवा करणाºया डॉक्टरांना त्यांच्या चांगल्या कामाचे श्रेयदेखील दिले जात नाही. किंबहूना प्रशासकीय यंत्रणेत थेट सहभागाची व्यवस्थाच नसल्याने ज्या रुग्णालयाच्या अंतर्गत आणि विभागाच्या कार्यक्षेत्रात काम करावे लागते. त्यांच्या कामगिरीत बाल आरोग्य मिशनची कामगिरी जोडली जाते. त्यामुळे दूरवर काम करून दूरच राहण्याची ही प्रक्रिया आहे. या डॉक्टरांना सन्मानाने मूळ प्रवाहात आणले पाहिजे. राष्ट्रीय मिशनचे हे मुख्य घटक आहे.- डॉ. दिनेश भामरेडॉक्टरांना ओळख मिळावी हीच अपेक्षा !प्रशासकीय आणि शासनाच्या पातळीवर राष्टÑीय बाल आरोग्यातील डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा समोर आलेला आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या भरती संदर्भातील उदाहरण तर मोठे आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून या मोहिमेत काम करणाºया वरिष्ठ डॉक्टरांना कमी वेतन आणि येणाºया नवीन डॉक्टांना थेट २८ हजारांची सुरुवात देणे कुठेतरी तफावत दर्शविणारे आहे. प्रश्न मानधनाचा, पैशांचा नाही तर विश्वासाचा आहे. कमी वेतनात वर्षानुवर्ष ग्रामीण भागात सेवा देणाऱ्यांचा अगोदर विचार झाला तर न्यायाचे झाले असते. राज्य आर्थिक पाहणी अहवालात या कार्यक्रमाचे केलेले कौतुक म्हणजे डॉक्टरांचे काम अधोरेखित करणारे आहे. या डॉक्टरांना त्यांची ओळख मिळावी हीच अपेक्षा- डॉ. राहुल खैरनारबाल आरोग्य क्षेत्रातील योगदान लक्षात घ्यावेबाल आरोग्य तपासणी करणे आणि त्यांना उपचारासाठी संदर्भित करण्यासंदर्भात इतक्या वरवर या कामाकडे पाहता येणार नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य आणि देशपातळीवरील आकडेवारी पाहिली तरी या कामात योगदान देणाºया डॉक्टरांची मेहनत अधोरेखित होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहाणी अहवालातदेखील या राष्टÑीय मिशनच्या यशाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या अभियानातील डॉक्टरांना अतिशय कमी वेतनात काम करावे लागते. अस्थायी स्वरूपातील या डॉक्टरांनी सेवा म्हणून गेल्ी अनेक वर्षेेया मोहिमेत कामे केली आहेत. त्यांच्या हेतूला कमी लेखून चालणार नाही. त्यांना त्यांचा सन्मान मिळावा हीच अपेक्षा.- डॉ. संदीप पाटीलरुग्णावर कौटुंबिक जिव्हाळ्याने उपचारशालेय पातळीवर नियमितपणे तपासणी करताना आढळणाºया आजारासंबंधी लागलीच दखल घेत पुढील उपचारासाठी धावपळ करावी लागते. अगदी रुग्णालयात दाखल करण्यापासून ते संपूर्ण उपचार मिळेपर्यंत नियमीत संपर्क ठेवण्याची जबाबदारी घेतली जाते. संबंधित मुले व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच आरोग्यविषयक पूर्णत: मोफत सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एक डॉक्टर म्हणून एखाद्या रुग्णासाठी अशा प्रकारचे प्रयत्न बाल मिशनमध्ये केला जातो.- डॉ. दिनेश पंचभाईश्रेय आणि लाभापासून दूरचसन २००८ पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जात असली तरी त्यापासून अपेक्षित असे निदान आणि उपचार होत नसल्याने २००८ मध्ये शासनाने शालेय आरोग्य कार्यक्रम आखली आणि त्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू झाली. राज्यातील या मोहिमेत बालकांवरील उपचाराचा सकारात्मक परिणाम झाल्याने केंद्राने २०१३ मध्ये राष्टÑीय बाल आरोग्य केंद्राची स्थापना करून अंगणवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. जागतिक संघटना या मोहिमेतील डॉक्टरांच्या उपचाराच्या यशाची गाथा गात असताना आपले प्रशासन मात्र अजूनही मोहिमेचे श्रेय आणि लाभही देण्यास उत्सुक नाहीत असेच चित्र दुर्दैवाने दिसते.- डॉ. विशाल जाधव

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल