शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:16 IST

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देभाजपाला शह : जुन्या पदाधिकाºयांना आणणार प्रवाहातपक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी

नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांवर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदारसंघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गत गटबाजीला यापुढे थारा नको, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.शनिवारी सातपूरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपूर मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर येऊन गेलेले उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याची जोड देऊन त्याचे कौतुक केले होते व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केल्याने शनिवारच्या मिसळ पार्टीला संजय राऊत यांच्यासह जिल्हा संपर्क नेते आमदार अजय चौधरी हेदेखील उपस्थित होते.साधारणत: दीडशेहून अधिक जुने, निष्ठावंत शिवसैनिकांची यादी तयार करून त्यांना ‘मिसळ पार्टी’चे घरपोच निमंत्रण देण्यात आले व त्यांना शनिवारच्या मिसळ पार्टीत आदराचे स्थान देण्यात आले. काही कारणास्तव पक्षापासून दुरावले असलेले किंवा गटबाजीमुळे दूर गेलेल्यांचा सत्कारही यावेळी पक्ष नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी, महापालिका निवडणुकीत काय झाले ते विसरून व झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात मिसळा व त्यांची कामे करा, असा सल्ला देऊन ‘मिसळ पार्टी’ही मनोमीलनासाठी उपयुक्त असून, त्यात गटबाजीला थारा नको, प्रत्येक मतदारसंघात असा उपक्रम राबविला जावा व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सागिंतले. यावेळी आमदार चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. आगामी काळात नाशिक मध्य, नाशिक पूर्व या मतदारसंघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जुन्या सैनिकांना साथ या मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात असून, त्याची सुरुवात १९८२ पासून शिवसेनेत सक्रिय असलेले परंतु विविध कारणास्तव पक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली आहे.